प. पू. मौनी महाराज यांचे देहावसान ; भक्तगणांवर शोककळा …
वराड कुसरवे येथील प. पू. राणे महाराजांच्या मठात अग्नीसंस्कार
मालवण | कुणाल मांजरेकर
हजारो भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेल्या प. पू. मौनी महाराजांचे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास देहावसान झाले आहे. त्यांचे वय सुमारे ७० वर्षे होते. त्यांच्या पार्थिवावर वराड कुसरवे येथील प. पू. राणे महाराजांच्या मठात अग्नीसंस्कार करण्यात आले. यावेळी भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प. पू. मौनी महाराज हे मूळ कारवार नजिकचे रहिवासी होते. त्यांनी आजन्म मौनव्रत धारण केले होते. त्यामुळे त्यांचे मूळ नाव कोणालाही माहीत नव्हते. भक्तगण त्यांना मौनी महाराज याच नावाने ओळखत. प. पु. राणे महाराजांच्या मठात त्यांचे सातत्याने ये जा सुरू असायचे. तसेच अन्य दिवशी ते भक्तगणांच्या निवासस्थानी वास्तव्याला येत असत. कुडाळ पासून फोंडया पर्यंत ते सायकलने प्रवास करीत. त्यांना मानणारा मोठा भक्त समुदाय आहे. अलीकडे ते मालवण वायरी येथील दाजी हडकर यांच्या निवासस्थानीही मुक्कामी आले होते. दरम्यान त्यांच्या देहावसानाने भक्तगणांवर शोककळा पसरली आहे.