पेंडूर गावासाठी कंत्राटी कर्मचाऱ्याची नियुक्ती ; निलेश राणेंच्या हस्ते नियुक्तीपत्र
माजी चेअरमन सतीश पाटील यांचे प्रयत्न ; अशोक सावंत यांचा राणेंच्या माध्यमातून पाठपुरावा
मालवण : गेली अनेक वर्षे पेंडूर गावात कंत्राटी पद्धतीने एकच कर्मचारी कार्यरत असल्याने गावाची भौगोलिक रचना विचारात घेता एकच कर्मचारी वीज ग्राहकांना योग्य रीतीने सेवा देऊ शकत नव्हता. यासाठी माजी चेअरमन सतीश पाटील यांनी महावितरणकडे अनेक वर्षे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांनी भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून गावाची मागणी पूर्ण केली आहे. या गावासाठी दीपक वायंगणकर ह्या कंत्राटी कामगाराची नेमणूक करण्यात आली आहे. महावितरण ठेकेदार कंपनी मार्फत प्राप्त झालेले पत्र दिपक वायंगणकर यांना माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, माजी वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, संजू परब, दादा साईल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.