निलेश राणेंकडून कर्करोगग्रस्त महिलेला उपचारासाठी वैद्यकीय मदत
मुंबईतील जसलोक रुग्णालयात उपचार ; महिलेसह कुटूंबाने भेट घेत मानले आभार
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील त्रिंबक- वायंगणी येथील स्तनाच्या कर्करोगाने ग्रासलेल्या मीना दिलीप वायंगणकर या महिलेवर भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या पुढाकारातुन मुंबईतील जसलोक रुग्णालयात केमोथेरपी उपचार करण्यात आले. या उपचारानंतर संबंधित महिलेसह तिच्या कुटुंबीयांनी निलेश राणेंच्या अंधेरी येथील कार्यालयात भेट घेत त्यांचे आभार मानले. या महिलेची माहिती मिळाल्यानंतर तिला वैद्यकीय मदत देण्याचे निलेश राणेंनी जाहीर केले होते, त्यानुसार ही मदत दिल्याने राणे कुटुंबीयांच्या “देऊ शब्द तो पूर्ण करू” या ब्रीद वाक्याचा प्रत्यय आला आहे.
मालवण तालुक्यातील त्रिंबक वायंगणी गावामधील मीना दिलीप वायंगणकर या गरीब कुटुंबातील स्त्रीला स्तनाचा कँसर झाल्याने केमोथेरपीची आवश्यकता होती. यासाठी मुंबईतील जसलोक हाॅस्पीटल मध्ये पूर्ण सहकार्य ८ महिने चाललेले ८ केमोथेरपी पूर्ण करण्यात आले. वायंगणकर कुटुंबातील सदस्यांनी अंधेरी येथील सिंधुदुर्ग भवन येत निलेश राणे यांची सदिच्छा भेट घेऊन आभार मानले. यावेळी अरविंद सावंत, चंद्रशेखर राणे आदी उपस्थित होते.