काँग्रेसची उद्या मालवणात तातडीची बैठक ; आगामी निवडणूकीवर करणार चर्चा

प्रभारी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांची उपस्थिती ; तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांची माहिती

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बुधवार दि. ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता विधानसभा उमेदवार अरविंद मोंडकर यांच्या फोवकांडा पिंपळ, मालवण शहर येथील निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष इर्शाद शेख उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत भविष्यात होणाऱ्या जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणूक यांसोबत पक्षसंघटना बळकटीसाठी प्रयत्न करण्यासाठी चर्चा करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील सर्व सेल, विभाग पदाधिकारी व कार्यकर्त्यानी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!