भाजपाच्या माध्यमातून कुंभारमाठ पं. स. मतदार संघात वह्यावाटप

माजी जि. प. अध्यक्षा संजना सावंत, गोट्या सावंत यांच्यावतीने उपलब्ध

मालवण | कुणाल मांजरेकर

भाजप नेत्या तथा माजी जि. प. अध्यक्षा सौ. संजना सावंत आणि संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्यावतीने उपलब्ध झालेल्या वह्यांचे वाटप शुक्रवारी कुंभारमाठ पंचायत समिती मतदार संघातील शाळांमध्ये युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणी सदस्य मंदार लुडबे यांच्या माध्यमातून करण्यात आले.

यावेळी माजी सभापती मधुकर चव्हाण, कुंभारमाठ सरपंच प्रमोद भोगावकर, माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्या प्रणिता लंगोटे, माजी उपसरपंच बाळा माने, विनोद भोगावकर, शालेय पालक संघाच्या अध्यक्षा सौ. पुजा हळदणकर, आरोग्यसेवक श्री. नातेवाड, अंगणवाडी सेविका सौ. गावठे, सौ. गावकर, प्रथमेश गोसावी, दिपक माडये व शिक्षक कर्मचारीवृंद उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3606

Leave a Reply

error: Content is protected !!