मालवणात पर्यावरण मंत्र्यांचा वाढदिवस “पर्यावरणपूरक” उपक्रमांनी साजरा

युवासेनेचा उपक्रम : विद्यार्थी, युवकांसाठी हेल्पलाईनचीही घोषणा

कुणाल मांजरेकर

मालवण : युवासेनाप्रमुख तथा राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा ३२ वा वाढदिवस मालवणात युवासेनेच्या वतीने पर्यावरणपूरक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरात नागरिकांना पर्यावरण संतुलन राखणाऱ्या त्याच बरोबर उत्पन्न मिळवून देणाऱ्या काजू आणि कोकमच्या रोपांचे वाटप करण्यात आले. दरम्यान, दोन वर्षानंतर शाळा, कॉलेज सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना निर्माण होणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच शासनाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या रोजगाराबाबत मार्गदर्शन करण्यासाठी “हेल्पलाईन” सुरू करण्याची घोषणा युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर यांनी यावेळी केली.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस मालवणात युवासेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात पर्यावरण पूरक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला. आदित्य ठाकरे यांच्या ३२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ३२० काजू व कोकम रोपांचे वाटप शिवसेना शाखा कार्यालय मालवण येथे करण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, उपशहर प्रमुख किसन मांजरेकर, सन्मेष परब, यशवंत गावकर, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, माजी नगरसेविका आकांक्षा शिरपुटे, माजी नगरसेवक पंकज सादये, महेंद्र म्हाडगूत, तपस्वी मयेकर, नरेश हुले, अमेय देसाई, चंदू खोबरेकर, बाळू नाटेकर, मनोज मोंडकर, समीर लब्दे, नंदा सारंग निनाक्षी शिंदे, बाबा मडये, दत्ता पोईपकर आदी उपस्थित होते.

युवासेनेकडून हेल्पलाईनची घोषणा

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेच्या वतीने हेल्पलाईनची घोषणा यावेळी युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर यांनी केली. यावेळी ते म्हणाले, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कमी वयात राज्याचे पर्यावरण, पर्यटनमंत्री पद सांभाळताना आपले नेतृत्व गुण सिद्ध केले आहेत. त्यामुळे त्यांचा वाढदिवस साजरा करताना पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मागील दोन वर्षे शाळा, कॉलेज बंद असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश घेताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही अडचण दूर करण्यासाठी युवासेनेच्या माध्यमातून हेल्पलाईन सुरू करण्यात येत आहे. ही हेल्पलाईन २४ तास कार्यान्वित राहील. यामध्ये विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या कोणत्याही समस्या सोडवण्यात येणार आहेत. त्याच बरोबर युवकांना स्वयंरोजगार करताना निर्माण होणाऱ्या अडचणींची देखील सोडवणूक करताना त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार असल्याचे श्री. ओरसकर म्हणाले.

असे असतील हेल्पलाईनचे नंबर

मंदार ओरसकर – ८२७५५५७७८८
निनाक्षी शिंदे – ९३२५९४१७९८
शिल्पा खोत – ९३२६४७७७०७
सिद्धेश मांजरेकर – ७०२१९८११८०
दत्ता पोईपकर – ९४०५६१९८७१
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3585

Leave a Reply

error: Content is protected !!