महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त गणपत मसगे यांचा पिंगुळी भाजपाच्या वतीने सत्कार
पिंगुळी गावच्या सांस्कृतिक- कला क्षेत्रात अजून एक मानाचा तुरा : रणजित देसाई
कुडाळ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय मार्फत विविध सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये पिंगुळी गावच्या गणपत मसगे यांना आदिवासी गिरीजन या क्षेत्रासाठी सन २०२०-२१ चा पुरस्कार जाहीर करण्यात आला. या निमित्ताने पिंगुळी भाजपाच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य, गटनेते तथा भाजपचे उपजिल्हाध्यक्ष रणजित देसाई यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री. देसाई व सहकाऱ्यानी गणपत मसगे यांच्या ठाकरवाडी म्युझियम तसेच नव्यानेच केलेल्या कोकण कृषि म्युझियमला भेट दिली. यावेळी भाजप शहर अध्यक्ष अजय आकेरकर, पिंगुळी सहकारी सोसायटी अध्यक्ष विजय दळवी, सिंधुदुर्ग ठाकर समाज जिल्हाध्यक्ष अण्णा रणसिंग, दिलीप मसगे, विठ्ठल मसगे, राजन रणसिंग, रणजित रणसिंग, राजेश सिंगनाथ, नरेंद्र बावलेकर, दीपक पाटील, सतीश माडये, ग्रा. प. सदस्य शिवदास मसगे, प्रसन्न गंगावणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.