तारकर्ली दुर्घटनेनंतर मालवण ग्रामीण रुग्णालयात तातडीने दोन व्हेंटिलेटर
आरोग्यमंत्री राजेश टोपे, आ. वैभव नाईक यांची तत्परता : तपस्वी मयेकर यांची माहिती
मालवण : तारकर्ली समुद्रात होडी उलटून दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडल्यानंतर व्हेंटिलेटरचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर मालवण ग्रामीण रुग्णालयात तातडीने दोन व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. राज्यातील ठाकरे सरकार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह आमदार वैभव नाईक यांनी ही तत्परता दाखविल्याची माहिती युवासेना उपशहरप्रमुख तपस्वी मयेकर यांनी दिली आहे.
ज्या ज्या ठिकाणी आपल्या नागरिकांना अडचणीला तोंड द्यावे लागते, त्याठिकाणी त्यांच्या पाठीशी खंबीर राहणारे आमदार वैभव नाईक हेच आहेत. हे परत एकदा त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले, अशी प्रतिक्रिया तपस्वी मयेकर यांनी दिली आहे.