निलेश राणेंच्या आमदारकीसाठी घुमडाई देवीला साकडं

घुमडे येथील घुमडाई देवी चरणी गावकऱ्यांचे गाऱ्हाणे ; वर्धापन दिन सोहळ्या निमित्ताने निलेश राणे यांनी घेतले देवीचे दर्शन

मालवण : मालवण तालुक्यातील निसर्गसंपन्न घुमडे गावातील श्री देवी घुमडाई मंदिर मूर्तीप्राणप्रतिष्ठापना व जीर्णोद्धार दिनाचा ११ वा वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्या निमित्त रविवारी भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले. यावेळी ‘निलेश राणे मालवण कुडाळ मतदारसंघातुन मोठ्या मताधिक्याने आमदार होऊदे’ असे गाऱ्हाणे उपस्थित गावकरी यांनी देवी चरणी घातले. यावेळी निलेश राणे यांचा विशेष सत्कारही करण्यात आला.

यावेळी प्रदीप बिरमोळे, महादेव बिरमोळे, सुरेश बिरमोळे, विष्णू बिरमोळे यासह भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाऊ सामंत, घुमडे सरपंच दिलीप बिरमोळे, उपसरपंच राजेश सावंत, अमोल केळुसकर, उमेश बिरमोळे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आबा हडकर, राकेश सावंत, बाळू राणे, सूर्यकांत बिरमोळे व अन्य उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!