काळसेत बीएसएनएल टॉवरचे उद्घाटन तर संरक्षक भिंतीचे भूमिपूजन
खा.विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून विकास कामे
मालवण : मोबाईल रेंजची समस्या असलेल्या काळसे गावात खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून बी.एस.एन.एल. मोबाईल टॉवर उभारण्यात आला आहे. या टॉवरचे उद्घाटन खासदार विनायक राऊत आणि कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी पार पडले. त्यामुळे गावातील रेंजची समस्या आता दूर झाली आहे.
दरम्यान, आमदार वैभव नाईक यांनी आपल्या आमदार फंडातून काळसे गोसावीवाडी श्री सिद्धमहापुरुष मंदिर नजीक संरक्षक भिंतीसाठी ६ लाख रु. चा निधी मंजूर केला असून त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी माजी जि.प.सदस्य नागेंद्र परब, माजी जि. प. अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शिवसेना विभागप्रमुख अण्णा गुराम, सुनील सावंत, बाळ महाभोज, यशवंत भोजने, बाबू टेंबुलकर, संदीप सावंत, अनिल प्रभू, जयवंत केळुसकर, केशव सावंत, राजन प्रभू, उमेश प्रभू, नंदू प्रभू, बीएसएनएलचे उप मंडल अभियंता (मालवण) प्रवीण कवडे, मोबाईल उप मंडल अभियंता सुधीर देशमुख, आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.