लांगूनचालन करणाऱ्यांना महाराष्ट्राच्या जनतेने थारा दिला नाही…

खासदार नारायण राणेंचे टिकास्त्र : उद्धव ठाकरेंच्या पक्षाची मस्ती मतदारांनी उतरवल्याचीही प्रतिक्रिया

हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी बांधिलकी राखणाऱ्या महाराष्ट्रातील सुज्ञ मतदारांना मानाचा मुजरा

सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. या निकालानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या निवडणुकीत लांगूनचालन करणाऱ्यांना महाराष्ट्राच्या जनतेने थारा दिला नाही, असं सांगून उद्धव ठाकरेंच्या पक्षाची मस्ती मतदारांनी उतरवल्याचीही प्रतिक्रिया राणे यांनी व्यक्त केली आहे.

याबाबत आपल्या एक्स अकाउंट वरून दिलेल्या प्रतिक्रियेत खा. नारायण राणे यांनी म्हटले आहे की,महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीतील ऐतिहासिक व एकतर्फी विजयाबद्दल भाजप नेते श्री. देवेंद्रजी फडणवीस, शिवसेना नेते श्री. एकनाथजी शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते श्री. अजित पवार यांचे मनापासून अभिनंदन ! या विजयासाठी महाराष्ट्रावर मेहनत घेणारे आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी, श्री. अमित शहाजी आणि भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार ! लांगुलचालन करणा-यांना महाराष्ट्राच्या जनतेने थारा दिला नाही. लांगुलचालन करणा-यांची लाळ घोटणा-या, प्रचारामध्ये अशोभनीय भाषा वापरुन थिल्लरपणा व गलिच्छ भाषेत विरोधकांवर वैयक्तिक टीका करणा-या उध्दव ठाकरे यांच्या पक्षाची मस्ती मतदारांनी उतरवली. हिंदुत्व आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी बांधिलकी राखणा-या महाराष्ट्रातील सुज्ञ मतदारांना मानाचा मुजरा ! महायुती सरकारला पुढील पाच वर्षांच्या यशस्वी कामगिरीसाठी कोटी कोटी शुभेच्छा !, असे खा. नारायण राणे यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3844

Leave a Reply

error: Content is protected !!