गवंडीवाडा राम मंदिरात रामनवमी आणि हनुमान जयंती सोहळा
“खेळ पैठणीचा”, रेकॉर्ड डान्स स्पर्धा यांसह विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
कुणाल मांजरेकर
मालवण : शहरातील गवंडीवाडा येथील श्री राम मंदिर येथे १० एप्रिल रोजी रामनवमी उत्सव तर १६ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ११ वाजता बाळ कासरलकर यांचे कीर्तन होणार आहे दुपारी १२.३० वाजता श्रीराम जन्म सोहळा होणार आहे. दुपारी १ ते ३ यावेळेत महाप्रसाद होणार आहे. रात्री ९ वाजता खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे रोहित परुळेकर (९४२१२६८६१६), आराध्या गवंडी (९४०५८०५८५०) यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे. १३ एप्रिल रोजी रात्री दहा वाजता रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे दिनेश वराडकर (९०४९०८११८१) यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे.
१६ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळा होणार आहे. त्यानंतर रात्री दहा वाजता ‘स्वामी’ हे ऐतिहासिक नाटक सादर होणार आहे. या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम मंदिर गवंडीवाडा यांच्यावतीने करण्यात आले आहे.