ना. राणेंच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी सी फूड पाककला आणि फनी गेम्स स्पर्धा
मालवण शहर महिला भाजपचे आयोजन ; महिलांनी सहभागी होण्याचे सौ. अन्वेशा आचरेकर यांचे आवाहन
कुणाल मांजरेकर
मालवण : भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण शहर महिला भाजपाच्या वतीने १० एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे मच्छिवर आधारित सी फूड पाककला आणि महिलांसाठी फनी गेम्स स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे.
या स्पर्धेतील प्रथम विजेत्या तीन महिला स्पर्धकांना आकर्षक पैठणी देण्यात येणार आहे. ही स्पर्धा महिला वर्गासाठी खुली असून या स्पर्धेत वयाचे बंधन नाही. स्पर्धेसाठी प्रथम येणाऱ्या २५ महिला स्पर्धकांचा विचार केला जाणार आहे. मच्छिवर आधारित बनविण्यात आलेले पदार्थच स्पर्धेसाठी विचारात घेतले जाणार असून स्पर्धकांनी घरातून बनविलेला खाद्यपदार्थ स्पर्धा स्थळी आणावा. स्पर्धेसाठी बनविलेल्या पदार्थासाठी वापरलेले साहित्य तसेच पाककृती स्पर्धकांनी लिहून आणणे व परीक्षकांना त्याची माहिती देणे स्पर्धकावर बंधनकारक राहील. स्पर्धकांनी आपल्या पाककृती सजावटीसह स्पर्धा स्थळी स्पर्धा वेळेपासून म्हणजेच सायंकाळी ४ वाजल्यापासून पुढील अर्ध्या तासात मांडाव्यात. त्यानंतर आलेल्या पाककृतींचा विचार केला जाणार नाही. स्पर्धेसाठी स्पर्धकाने स्वतः बनविलेला पदार्थ आणावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही.
या पाककला स्पर्धेबरोबरच महिलांसाठी फनी गेम्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत. या दोन्ही स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिलांनी आपली नावे ९ एप्रिल पर्यत मालवण शहर भाजप कार्यालय मामा वरेरकर नाट्यगृहा समोर नोंदवावीत, अधिक माहितीसाठी बाळू मालवणकर ९४२३८८०९९१, अन्वेषा अजित आचरेकर. ९४०४३४४३२२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महिला शहर अध्यक्षा सौ. अन्वेशा अजित आचरेकर, माजी नगरसेविका सौ. पूजा करलकर, सौ. ममता वराडकर (माजी नगरसेविका), सौ. पूजा सरकारे, सौ. नमिता गावकर (अध्यक्षा भाजपा चित्रपट महिला ), अंजली पराडकर, पूजा वेरलकर, महानंदा खानोलकर यांनी केले आहे.