डेरवण येथील राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत कु. आर्या दिघे उपविजेती

श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट अकॅडमीच्या वतीने डेरवण युथ गेम्स २०२२ टेबलटेनिस स्पर्धा संपन्न

कुणाल मांजरेकर

मालवण : श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डेरवण युथ गेम्स २०२२ या राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत ११ वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये मालवण येथील कु. आर्या दिघे हिने उपविजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत कु. आर्या हिने १७ वर्षाखालील मुलींच्या गटामध्येही तृतीय क्रमांक पटकाविला.

अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट आयोजित डेरवण युथ गेम्स २०२२ राज्यस्तरीय टेबलटेनिस स्पर्धा १६ आणि १७ मार्च रोजी डेरवण चिपळूण येथे संपन्न झाली. या राज्यस्तरीय स्पर्धेत मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, जळगाव येथील अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. कु. आर्या दिघे मालवण येथील कोरगावकर टेबल टेनिस अकॅडमीचे विष्णू कोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली टेबलटेनिसचा सराव करीत आहे. या पूर्वीही २०२० मध्ये ११ वर्षाखालील मुलींच्या गटात तीने उपविजेता, २०२१ मध्ये विजेतेपद पटकाविले आहे. आता २०२२ मध्ये ११ वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये उपविजते शिवाय १७ वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये तृतीय क्रमांक मिळवून आर्याने या स्पर्धेत आपला ठसा उमटविला आहे. कु. आर्या हिने मिळविलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. तिच्या या कामगिरीने मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. 

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!