निलेश राणेंच्या वाढदिवसा निमित्त सुपारी वृक्ष आणि औषधी वनस्पती रोपांचे वाटप

माजी सभापती अजिंक्य पाताडे यांचा उपक्रम

मालवण : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त मालवण पं. स. चे माजी सभापती अजिंक्य पाताडे यांच्यावतीने गोळवण मध्ये ग्रामस्थांना सुपारी वृक्ष आणि औषधी वनस्पतीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी गोळवण सरपंच सुभाष लाड, भाजप शक्ती केंद्र प्रमुख विजय निकम, ग्रामपंचायत सदस्य विरेश पवार, शरद मांजरेकर, भाई चिरमुले, भाजप कार्यकर्ते उत्तम पाताडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. गोळवण ग्रामपंचायतीच्या वतीने यावेळी वनौषधी लागवड संदर्भात मार्गदर्शन देखील करण्यात आले. याचा देखील ग्रामस्थांनी लाभ घेतला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!