खा. विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ मुलांना खाऊ वाटप
उपजिल्हाप्रमुख बबन शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा उपक्रम
मालवण : शिवसेना खासदार विनायक राऊत साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने येथील फातीमा काॅन्व्हेट मध्ये अनाथ मुलांसोबत केक कापण्यात आला. यावेळी येथील लहान मुलांना अन्नधान्य व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी उपशहर प्रमुख किसन मांजरेकर, उपशहर प्रमुख बाळु नाटेकर, युवासेना उपतालुकाप्रमुख आतु फर्नांडिस, गणेश कुडाळकर, नंदु गवंडी आदी उपस्थित होते.