माजी खा. निलेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम
मालवण तालुका भाजपचे आयोजन ; वाढदिवसा निमित्ताने पक्ष नेतृत्वाकडे करणार “ही” मागणी
कुणाल मांजरेकर
मालवण : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांचा १७ मार्च रोजी होणारा वाढदिवस मालवण तालुक्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी दिली आहे. दरम्यान, माजी खा. राणेंच्या वाढदिवसा निमित्ताने कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार आगामी विधानसभा निवडणुकीत कुडाळ- मालवण मतदार संघातून श्री. राणेंना उमेदवार म्हणून जबाबदारी देऊन पक्ष संघटना बळकट केली जावी, अशी मागणी केली जाणार असल्याचेही श्री. चिंदरकर यांनी म्हटले आहे.
मालवण तालुक्यात प्रत्येक विभागात निलेश राणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीर, इ श्रम कार्ड वाटप, आरोग्य शिबीर, क्रीडास्पर्धा, आधारकार्ड अपडेट, रुग्णांना फळ वाटप करण्यात येणार आहे. तसेच विविध ठिकाणी विकास कामांचा शुभारंभ देखील करण्यात येणार आहे. दरम्यान, निलेश राणे यांना मालवण कुडाळ मतदार संघातील उमेदवार म्हणून जबाबदारी देऊन पक्षसंघटना अधिक बळकट व्हावी यासाठी पक्षाकडे मागणी केली जाईल आणि पक्ष नेतृत्व निश्चितपणे ही जबादारीही देईल. हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विश्वास आहे, असेही श्री. चिंदरकर यांनी म्हटले आहे.