मालवणात शाळकरी मुलीचे निधन ; गावावर शोककळा
मालवण : मालवण तालुक्यातील कातवड येथील कु.सायली संजय धुरी (वय १६) या शाळकरी मुलीचे मंगळवारी अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले.
मालवण कातवड येथे राहणारी आणि मालवणच्या भंडारी ए. सो. हायस्कुल मध्ये इयत्ता दहावी मध्ये शिकत असलेली कु. सायली धुरी ही गेले काही दिवस कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटल येथे कावीळ आजारावर औषधोपचार घेत होती. आज तिची प्रकृती अधिक चिंताजनक बनली होती. यातच तिचे निधन झाले. तिच्या पश्चात आई, वडील, आजोबा, काका, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. तिच्या आकस्मिक निधनामुळे कातवड गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.