खा. विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त कांदळगाव रामेश्वर मंदिरात लघुरुद्र

तालुका शिवसेनेचा उपक्रम ; मालवण तालुक्यात विविध कार्यक्रम

मालवण : शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभण्यासाठी तालुका शिवसेनेच्या वतीने कांदळगाव येथील श्री रामेश्वर मंदिरात तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या उपस्थितीत लघुरुद्र आणि आरती करण्यात आली. खा. राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम संपन्न झाले.

यावेळी छोटू ठाकूर, राजेश गावकर, किरण वाळके, सुहास पेडणेकर, मसुरे सरपंच संदीप हडकर, पराग खोत, माजी विभागप्रमुख अमोल वस्त, उपविभागप्रमुख विजय पालव, विभाग प्रमुख अमोल परब, दीपक परब, कांदळगावचे माजी सरपंच रणजित परब, शशांक माने, युवासेना पदाधिकारी राहुल सावंत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!