मनसे आमदार राजु पाटील आंगणेवाडीत भराडी देवीच्या दर्शनाला

मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून मालवणात जल्लोषी स्वागत

कुणाल मांजरेकर

मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी गुरुवारी आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे दर्शन घेतले. दरम्यान, आ. पाटील आंगणेवाडी येथे येत असताना देऊळवाडा- आडारी रोड येथे फटाक्यांच्या आतषबाजीत मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषी स्वागत केले.

आ. पाटील यांनी गुरुवारी दुपारी आंगणेवाडी येथे भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मागील दोन वर्षे कोरोनामुळे आंगणेवाडीला येता आले नाही. मात्र देवीच्या दर्शनाची भूक आज मिटल्याचे सांगून देवी भराडीने कोरोनाची महामारी संपूर्ण दूर करावी, असे साकडे त्यांनी घातले.

दरम्यान, आंगणेवाडी येथे जाताना मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव व तालुका सचिव विल्सन गिरकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश अंधारी, तालुका उपाध्यक्ष उदय गावडे, मनविसे तालुका अध्यक्ष विनायक गावडे आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3849

Leave a Reply

error: Content is protected !!