अवजड वाहतुकीसाठी करुळ घाट ३ आठवडे बंद

सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) : 
राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 जी वरील करुळ घाट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग 166 जी वरील मौजे तळेरे ता. कणकवली पासून करुळ घाट, ता. वैभववाडी – गगनबावडा हद्दीपर्यंत रस्त्यावरील वाहतूक 3 आठवड्यांसाठी सर्व प्रकारच्या जड वाहनांसाठी बंद करणयाचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.
           
करुळ घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या घाटात सुरू असेलल्या जड वाहतुकीमुळे भरलेले खड्डे वारंवार उखडले जात असल्याने काम वेळेत होण्यास अडथळा निर्माण होत असल्याने घाटातील अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येत आहे. करुळ घाटातून होणारी वाहतूक पुढीलप्रमाणे पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. 1) कोल्हापूर वरुन येणारी अवजड वाहने खंडासरी (क्रशर चौक) चौकातून उजव्या वळणाने फोंडा घाटाने राष्ट्रीय महामार्ग 166 – जी कडे. 2) गोवा वरुन कोल्हापूरकडे जाणारी अवजड वाहने नांदगाव तिठ्ठ्यावरून फोंडा घाटातून कोल्हापूरकडे या पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने बंद करण्यात आलेला रस्ता व पर्यायी वाहतूक मार्ग लोकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी असेही या आदेशात म्हटले आहे

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

One comment

  1. सर्व प्रकारची जड वाहने यामध्ये एसटी बसचा समावेश होतो का, हे स्पष्ट करायला हवे होते. अशा public utilityच्या बातम्या सुस्पष्ट व सविस्तर असाव्यात.

Leave a Reply

error: Content is protected !!