महायुतीला सिंधुदुर्गातील मच्छिमार व किनारपट्टी समुदायाचा पुन्हा एकदा आशीर्वाद

भाजपा मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी मानले आभार

अनुभवी आणि सक्षम आमदार विधानसभेत गेल्यामुळे किनारपट्टी भागातील समस्या सोडवण्यास होणार मदत 

मालवण | कुणाल मांजरेकर

महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्रदीपक विजयात सिंधुदुर्गातील मच्छिमार व किनारपट्टी समुदायाने महत्वाचा वाटा उचलला आहे. जिल्ह्यातील किनारपट्टी भागात महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर, निलेश राणे आणि नितेश राणे यांना तब्बल ९७९४ एवढे मताधिक्य मिळाले असून १०८ पैकी ९१ बूथवर महायुतीला आघाडी मिळाली आहे. त्याबद्दल किनारपट्टीवरील मतदारांचे भाजपा मच्छीमार सेलतर्फे आभार मानत असल्याची प्रतिक्रिया भाजपा मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२१ किमी च्या किनारपट्टीवर देवगड नगर पंचायत आणि मालवण, वेंगुर्ला या दोन नगरपालिका असून ३२ ग्रामपंचायती आहेत. जिल्ह्यातील किनारपट्टीवर १०८ मतदान केंद्रे असून यापैकी ९१ मतदान केंद्रावर महायुती आघाडीवर आहेत. एकंदर मतदान ५६२०१ एवढे झाले असून महायुती यांना २९,३९४ तर महविकास व अपक्ष यांना २६८०७ मते पडली. म्हणजेच किनारपट्टी भागात तब्बल ९७९४ (52.30%) एवढे मताधिक्य मिळाले. महायुतीच्या या महविजयात सिंधुदुर्ग किनारपट्टीवर वसलेला मच्छीमार तसेच किनारपट्टीवरील इतर समुदाय याचा मोठा वाटा आहे. किनारपट्टी भागाला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. तिन्ही अनुभवी आणि सक्षम आमदार विधानसभेत निवडून गेल्यामुळे किनारपट्टी भागातील समस्या सोडवण्यात मदत होणार आहे. तसेच केंद्र व राज्यात  महायुतीचे डबल इंजिन सरकार असल्यामुळे मत्स्यव्यवसाय, पर्यटन व इतर पूरक व्यवसायासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना राबविण्यास बळकटी मिळेल अशी आशा रविकिरण तोरसकर यांनी व्यक्त केली आहे.

dipk

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3846

Leave a Reply

error: Content is protected !!