उद्धव ठाकरे आता तरी माती खायची बंद करा ; निलेश राणेनी सुनावले

तुम्ही पदावर असताना ज्यांना संपवायचा प्रयत्न केलात ते सगळे यशस्वी झाल्याचा टोला

मालवण | कुणाल मांजरेकर

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला आहे. यानंतरही ठाकरे गटाकडून इव्हीएमचे कारण काढून निकालबाबत शंका उपस्थित केली जात आहे. याचा शिवसेनेचे कुडाळ मालवण विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार निलेश राणे यांनी समाचार घेतला आहे.

याबाबत आपल्या एक्स अकाऊंट वरून दिलेल्या प्रतिक्रियेत निलेश राणे यांनी म्हटले आहे की, उद्धव ठाकरे आता तरी माती खायची बंद करा… महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला नाकारलं. तुम्ही पदावर असताना ज्यांना संपवायचा प्रयत्न केलात ते सगळे यशस्वी झाले. तुम्ही ज्यांची घरे पडायला निघाला होतात ते सगळे आमदार खासदार झाले. तुमची आणि तुमच्या मुलाची भाषा जनतेने नाकारली. तुमची आणि तुमच्या कुटुंबाची घमेंड उतरवली.आता नाही सुधरलात तर आयुषभर तुम्हाला आणि तुमच्या मुलाला मातीच खावी लागणार, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3845

Leave a Reply

error: Content is protected !!