कोकणचे किंगमेकर रवींद्र चव्हाण आंगणेवाडीत भराडी देवीच्या दर्शनाला ; महायुतीच्या कार्यकर्त्यांची अलोट गर्दी
भराडी आईच्या आशीर्वादानेच महाराष्ट्रात महायुतीचा महाविजय ; डोंबिवलीसह महाराष्ट्राच्या सेवेसाठी देवीने बळ देण्याची प्रार्थना : रवींद्र चव्हाण यांची माहिती
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी पालकमंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. भराडी आईच्या दर्शनाने प्रत्येक मनोरथ पूर्ण होते, अशी आम्हा कोकणवासीयांची भावना आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी आई भराडी देवीचे दर्शन घेत भाजप-महायुतीच्या यशासाठी आईच्या चरणी साकडे घातले होते. आईच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात महायुतीचा महाविजय व्हावा हे मनोरथ पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया आ. चव्हाण यांनी दिली आहे.
आमदार रवींद्र चव्हाण मंगळवारी दुपारी आंगणेवाडी येथे दाखल झाले होते. श्री भराडी देवीचे आशीर्वाद घेतल्यानंतर मंदिराच्या सभामंडपात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. कोकणातील महायुतीच्या विजयानंतर प्रथमच जिल्ह्यात आलेल्या आ. चव्हाण यांच्या अभिनंदनासाठी मोठ्या संख्येने भाजपा, शिवसेना आणी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने माजी आमदार प्रमोद जठार, ऍड. अजित गोगटे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, युवक जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजपा शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, रणजित देसाई, सुदेश आचरेकर, विजय केनवडेकर, गणेश कुशे, दादा साईल, राजू परुळेकर, सतीश वाईरकर, दाजी सावजी, सुमित सावंत, सचिन आंबेरकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अभि जोगी, महेश मांजरेकर, विजय निकम, नारायण लुडबे, विक्रांत नाईक, महेश बागवे, आबा हडकर, संतोष कदम, संजय वेंगुर्लेकर, बंड्या सावंत, ललित चव्हाण, शिवसेनेचे जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, युवा नेतृत्व प्रीतम गावडे, आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाचे काका आंगणे, बाबू आंगणे, दिनेश आंगणे तसेच महायुतीचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी आ. चव्हाण यांनी श्री क्षेत्र आंगणेवाडीला भेट देत भराडी आईचे मनोभावे दर्शन घेतल्यानंतर आपण डोंबिवलीसह महाराष्ट्राच्या सेवेसाठी सदैव कार्यरत राहणार असून यासाठी देवीने बळ द्यावे अशी प्रार्थना केली. याप्रसंगी देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.