“मातोश्री” च्या चौघांवर ईडीची नोटीस तयार ; नारायण राणेंचा खळबळजनक दावा

सुशांतसिंग, दिशा सालीयनचा खुनच ; तपासाची फाईल पुन्हा उघडणार

कुणाल मांजरेकर

सुशांतसिंग रजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियन हिची आत्महत्या नव्हे तर हत्या झाल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. या प्रकरणाच्या तपासाची फाईल पुन्हा एकदा उघडली जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचा आणखी एक दावा करून नारायण राणे यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे.

नारायण राणे आणि शिवसेनेतील वाद सध्या विकोपाला गेला आहे. दोन दिवसांपूर्वी नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत आणि शिवसेनेवर टीका केल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबई महानगरपालिकेने नारायण राणे यांचा जुहूतील अधिश बंगला अनधिकृत ठरवत नोटीस बजावली आहे. तर सायंकाळी या बंगल्याची महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी देखील केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी सायंकाळी ट्विट करून थेट ठाकरे कुटुंबाला हात घातला आहे. “खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी … लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले” असे ट्विट राणेंनी केले आहे. तसेच विनायक राऊत हे घडल्यावर आपले “बॉस ” आणि आपण कुठे धावणार ? असं दुसरं ट्विट देखील नारायण राणे यांनी केले आहे

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!