मालवणात २१ फेब्रुवारीला मोफत आधारकार्ड शिबिर
शहर युवक काँग्रेस आणि मालवणी संस्कृती व वारसा मंडळाचे आयोजन
मालवण : मालवण शहर युवक काँग्रेस आणि मालवणी संस्कृती व वारसा मंडळ, मालवण यांच्या वतीने सोमवारी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता अरविंद मोंडकर यांच्या फोवकांडा पिंपळ येथील निवासस्थानी आधारकार्ड नोंदणी आणि दुरुस्ती शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात नवीन आधारकार्ड बनवणे, लग्न झाल्यानंतर नावातील बदल, लहान मुलांचे आधार कार्ड बनवणे, मोबाईल नंबर लिंक करणे आणि आधारकार्ड मधील सर्व दुरुस्त्या करून मिळणार आहेत. तरी या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मालवणी संस्कृती व वारसा मंडळ, मालवणचे अध्यक्ष अरविंद मोंडकर आणि युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश पाडगावकर यांनी केले आहे.