निरोम गावात भाजपाला धक्का ; सोसायटी संचालकासह ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश
गावच्या विकासात भाजपा कमी पडत असल्याचा आरोप : आ. वैभव नाईक यांनी बांधले शिवबंधन
मालवण : भाजपचे निरोम सोसायटी संचालक सुभाष मांजरेकर यांच्यासह निरोम मांजरेकरवाडीतील ग्रामस्थांनी शुक्रवारी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. कणकवली विजय भवन येथे शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. सुभाष मांजरेकर यांनी निरोम सोसायटी संचालक बरोबरच उपसरपंच, पोलीस पाटील ही पदे भूषविली आहेत. निरोम गावचा विकास करण्यास भाजप कमी पडत असल्याने गावच्या विकासासाठी आमदार वैभव नाईक यांच्यावर विश्वास ठेवून आपण शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे ते म्हणाले.
यामध्ये निरोम मांजरेकरवाडीतील जगन्नाथ साटम, आबा मांजरेकर, सचिन आचरेकर, प्रकाश साटम, आशा जाधव, रेश्मा आचरेकर, प्रमिला साटम, प्राची आचरेकर, विजया मांजरेकर यांचा समावेश आहे.
यावेळी उपतालुकाप्रमुख बाबा सावंत, विभाग संघटक संतोष घाडी, माजी विभागप्रमुख दीपक राऊत, अरुण लाड, संजय पारकर, सुदाम राऊत, शाखा प्रमुख विनायक राऊत, उपशाखा प्रमुख प्रल्हाद राऊत, विश्वास आचरेकर, गणेश आचरेकर, दीपक सावंत, अभिमन्यू येरम आदी शिवसैनिक उपस्थित होते.