राणेंच्या आरोपांनंतर शिवसेनेकडून “लाव रे तो व्हिडीओ”
“ईडी” च्या भीतीनेच राणे पिता- पुत्रांचे भाजपा नेत्यांसमोर लोटांगण
शिवसेनेचे खासदार ईडी च्या संचालकांना भेटणार : विनायक राऊत
शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत व्हिडिओंची मालिका
संजय राऊत यांना बाळासाहेबांकडूनच शिवसेना नेतेपद बहाल : राऊत
मुंबई : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर केलेल्या टीकेचा खासदार विनायक राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. किरीट सोमय्या यांनी राणे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. यासह अनेक व्हिडिओ पत्रकार परिषदेत सादर करतानाच ईडीच्या भीतीनेच राणे पिता-पुत्रांनी भाजपा नेत्यांसमोर लोटांगण घातल्याची टीका विनायक राऊत केली. किरीट सोमय्या यांनी राणेंच्या विरोधात ईडी कडे केलेल्या तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, संजय राऊत यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे नेतेपद बहाल केले होते, असेही विनायक राऊत म्हणाले.
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर केलेल्या टीकेचा खासदार विनायक राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. किरीट सोमय्या यांनी राणे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. याचा व्हिडिओ पत्रकार परिषदेत सादर करतानाच ईडीच्या भीतीनेच राणे पिता-पुत्रांनी भाजपा नेत्यांसमोर लोटांगण घातल्याची टीका विनायक राऊत केली. किरीट सोमय्या यांनी राणेंच्या विरोधात ईडी कडे केलेल्या तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी शिवसेनेचे सर्व खासदार ईडीच्या संचालकांची भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, संजय राऊत यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे नेतेपद बहाल केले होते, असेही विनायक राऊत म्हणाले.
शिवसेना भवन मध्ये शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नारायण राणेंसह किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. विनायक राऊत म्हणाले की, संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहे. बाळासाहेबांनीच त्यांना नेते केलं होतं. संजय राऊत हे सामनाचे संपादक आहेत, त्याचबरोबर ते आमचे नेते आहेत. ईडीद्वारे त्यांना त्रास दिला गेला. पण ते खऱ्या अर्थाने शिवसैनिक असल्यामुळे त्यांनी निधड्या छातीनं सेनाभवनात पत्रकार परिषद घेतली. त्याउलट राणेंच्या मागे जेव्हा ईडी लागली तेव्हा ते आणि त्यांचे चिरंजीव दिल्लीला गेले आणि चोर वाटेनं भाजप नेत्यांच्या समोर लोटांगण घातले. आज राणे यांना भाजप प्रेमाचा, मोदी प्रेमाचा कंठ फुटला आहे तो किती बेगडी आहे हे दिसून येतं. राणेंनी एक लक्षात घ्यावं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद भूषवत असताना कोरोनाचा काळ असूनही सर्व देशवासियांकडून आदर्श मुख्यमंत्री म्हणून पाच मुख्यमंत्र्यांमध्ये दोन वेळा उद्धव ठाकरेंना नामांकन मिळालं आहे. त्यात भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याचा समावेश नाही.
नारायण राणे यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेस उमेदवार सागर मेघे यांचा प्रचार करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. त्यात ‘खोटा बोला पण रेटून बोला त्याचं नाव नरेंद्र मोदी’ असं राणे म्हणाले होते, याची आठवण विनायक राऊत यांनी करून दिली.
विनायक राऊत यांनी सोमय्या यांची एक व्हिडीओ क्लिप दाखवली. किरीट सोमय्या यांनी राणेंविरोधात आरोपांची एक मालिका चालवली होती. तेव्हा त्यांनी राणेंच्या पत्नीच्या नावे कणकवलीतील निलम हॉटेलमधील गैरव्यवहार, मायनिंगबाबत अनेक आरोप केले होते. तसंच राणेंनी १०० बोगस कंपन्या निर्माण केल्याचा आरोपही सोमय्यांनी केला होता, असं राऊत म्हणाले.
राजन तेलींच्या मुलावर हल्ला कोणी केला, शिवसेनेने दाखवला “तो” व्हिडीओ
भाजपचे सिंघुदुर्गचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा मुलगा प्रथमेश तेली हे एकदा कोकण रेल्वेनं कणकवलीकडे चालले होते. दादर रेल्वे स्थानकावर काही गुंडांनी भरधाव चाललेल्या कोकण रेल्वेखाली राजन तेली यांच्या मुलाला कसं ढकललं. त्यावेळी राजन तेली यांनी कुणावर आरोप केले होते? ते एकदा जरा ऐका असं म्हणत शिवसेनेने त्याबाबतचीही एक क्लिप आपल्या पत्रकार परिषदेत दाखवली.