चिवला बिच विविध विकास कामांचा शुभारंभ

माजी नगरसेवक यतीन खोत यांचा पाठपुरावा ; नागरिकांनी मानले आभार

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण चिवला बिच मार्गावर वालावलकर उद्यान येथून पावसाळी पाणी निचरा होण्यासाठी मालवण नगरपालिकेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या आरसीसी चेंबर व क्रॉसिंग बांधकाम कामाचा शुभारंभ डॉ. राहुल पंतवालावलकर यांच्या हस्ते करण्यात आला.

माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या कार्यकाळात अनेक विकासकामे मंजूर झाली. त्यापैकी अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. अनेक कामे पुर्णत्वासही गेली आहेत. नागरिकांची मागणी लक्षात घेऊन माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी शहरात अनेक विकासकामे प्राधान्याने मंजूर केली. वरील कामेही मंजूर होऊन ती पूर्णत्वास जात असल्याबाबत नागरिकांच्या वतीने माजी बांधकाम सभापती यतीन खोत व माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचे आभार मानण्यात आले.

यावेळी शहर प्रमुख बाबी जोगी, महिला तालुकाप्रमुख दीपा शिंदे, उपशहर प्रमुख यशवंत गावकर, भाई कासवकर, शांती तोंडवळकर, यशवंत गावकर, बाळू नाटेकर, प्रसाद आडवणकर, मनोज शिरोडकर,
रुजाय फर्नांडीस, नरेश हुले, साक्षी मयेकर, संतोष सावंत, प्रमोद वायंगणकर, विजय केळुस्कर, किशोर मयेकर, काशिनाथ मांजरेकर, रुपेश कांबळी, उदय परब, दादा पाटकर, समीप केळुस्कर, आकाश वालावलकर, पार्थ परब, प्रसन्न मयेकर, गणेश मयेकर यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!