मालवण शहरात प्रभाग ८ मध्ये उद्या कोविड लसीकरण
मालवण : शिवसेनेच्या माजी नगरसेविका तृप्ती मयेकर यांच्या संकल्पनेतून व माजी नगरसेवक पंकज सादये आणि माजी नगरसेविका सेजल परब यांच्या सहाय्याने उद्या मंगळवारी १५ फेब्रुवारी रोजी वायरी गर्देरोड येथील शांताराम निवास येथे सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत कोविड लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात येणार आहे. तरी वायरी हिंदळेकरवाडा, भरडेवाडा, लुडबेवाडी आणि नजीकच्या नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी नगरसेविका तृप्ती मयेकर यांनी केले आहे.