मेढा येथे उद्या ई श्रम कार्ड आणि आधारकार्ड दुरुस्ती शिबिर
माजी नगरसेवक गणेश कुशे, ममता वराडकर यांच्या वतीने आयोजन
मालवण : भाजपचे माजी नगरसेवक गणेश कुशे आणि माजी नगरसेविका ममता वराडकर यांच्या वतीने मंगळवारी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कचेरी रोड मेढा येथील फातिमा कॉन्व्हेंट समोर प्रशांत मांजरेकर यांचे हॉटेल मालवणी मेजवानी येथे आधारकार्ड दुरुस्ती व नवीन आधार नोंदणी तसेच ई श्रम कार्ड शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गणेश कुशे आणि ममता वराडकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.