कुडाळात महाविकास आघाडीचा विजयी जल्लोष

आ. वैभव नाईक यांची उपस्थिती

कुडाळ : कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणूकीत भाजप उमेदवारांना धूळ चारत नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या सौ. आफ्रीन करोल तर उपनगराध्यक्षपदी मंदार शिरसाट हे विजयी झाले आहेत या विजयानंतर आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला. फटाके फोडून, घोषणाबाजी देत, ढोलताशाच्या गजरात कुडाळ शहरात विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शिवसेना, काँग्रेससह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!