नाजूक प्रकरणातून “व्हॅलेंटाईन डे” च्या पुर्वसंध्येला युवकावर हल्ला
कणकवली मधील घटना ; युवकावर गुन्हा दाखल
कणकवली: मैत्रिणीला फोन लावल्याच्या रागातून कणकवलीत एका तरुणावर ब्लेड सदृश्य शस्त्राने हल्ला झाल्याची घटना रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कणकवली शहरात गणपती सानाजवळ रविवारी रात्री घडलेली घटना नशेत घडल्याचे समोर आले आहे. यातील संशयित आरोपी हा मद्यपान करून असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी अल्पवयीन असलेल्या फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार वार करणारा विशाल भोजनिया ( रा. जानवली – कणकवली) याच्याविरोधात कणकवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील कणकवली शहरातील अल्पवयीन युवक असलेल्या फिर्यादीने संशयित आरोपी विशाल भोजनिया याच्या मैत्रिणीला फोन करत मेसेज टाकल्याच्या कारणातून जाब विचारत ब्लेड् सदृश्य वस्तूने वार करण्यात आले. यात फिर्यादीच्या हात व मानेला दुखापत झाली असून फिर्यादीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संशयित आरोपी च्या विरोधात 324, 323, 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार येडवे करत आहेत.