वायरीच्या राजाची दत्ता सामंतांकडून सपत्नीक पूजा
मालवण : संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतन नजीक सिद्धिविनायक पटांगणावर सलग १२ व्या वर्षी भरवण्यात आलेल्या माघी गणेशोत्सव सोहळ्यानिमित्ताने येथे स्थानापन्न झालेल्या वायरीच्या राजाची भाजपचे नेते दत्ता सामंत यांनी सपत्नीक पूजा केली.
सामाजिक कार्यकर्ते संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून शासकीय तंत्रनिकेतन नजीक सिद्धिविनायक पटांगणावर ४ ते १० फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी १० फेब्रुवारी रोजी येथील श्री गणेशाचे विसर्जन होणार आहे. सोमवारी भाजपचे नेते दत्ता सामंत यांच्या हस्ते येथील गणरायाची सपत्नीक पूजा करण्यात आली. यावेळी संजय लुडबे, संजीवनी लुडबे, मंदार लुडबे, सुभाष लुडबे, भाई मांजरेकर, शैलेश लुडबे, संदीप लुडबे, किशोर चव्हाण, समिर चव्हाण, जगदिश हडकर, उदय लुडबे, अक्षय नरे, विजय तळगावकर, प्रशांत बिरमोळे, दिपु माडये, साईनाथ लोके, अनिल गांवकर, आदित्य खाजनवाडकर, प्रथमेश गोसावी, अक्षय राऊत, साहील लुडबे यांच्यासह मंडळाचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.