भजनी बुवांचा आ. वैभव नाईक यांनी केला सत्कार

कासार्डे शिवसेना शाखेत आयोजित माघी गणेश जयंती उत्सवाला भेट

कणकवली : कासार्डे तिठा शिवसेना शाखा येथे माघी गणेश जयंती उत्सवाला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन दर्शन घेतले. माघी गणेश जयंती निमित्त याठिकाणी प्रसिद्ध भजनी बुवा श्रीधर मुणगेकर व बुवा लक्ष्मण गुरव यांच्यात डबलबारी भजनाचा सामना आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते या दोन्ही बुवांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी कासार्डे शिवसेना विभागप्रमुख उपसरपंच बाबू पेडणेकर, विजय धुरी, बाळा पेडणेकर, सचिन आचरेकर, महेश देसाई, चेतन सावंत, राकेश पवार, श्रीधर परब, माया पेडणेकर, अनिकेत साटम, आत्माराम साटम, महादेव चव्हाण, महादेव सकपाळ आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!