मालवण भाजपचे पदाधिकारी गोव्यात तळ ठोकून ; मांद्रे मतदार संघात प्रचार मोहीम
कुणाल मांजरेकर
मालवण : गोव्यात विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होत असून प्रचार मोहीम जोमाने सुरू आहे. गोव्यातील मांद्रे मतदार संघात प्रचारासाठी मालवण भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ठाण मांडली असून मांद्रे मतदार संघातील मोर्जे येथे गुरुवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली.
गोवा विधानसभेतील मांद्रे मतदार संघातील आमदार दयानंद सोपटे यांच्या प्रचारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजपा पदाधिकारी आज मोर्जे येथे दाखल झाले होते. यावेळी केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक हे देखील प्रचारात सहभागी झाले होते. त्यांच्या सोबत भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हा उद्योग व्यापार आघाडी जिल्हा संयोजक विजय केनवडेकर, माजी नगरसेवक गणेश कुशे, बुथ अध्यक्ष विजय चव्हाण, सचिन पेडणेकर, रुपेश पारकर आदी उपस्थित होते. हे पदाधिकारी मोर्जे गावातील बुथचे नियोजन करून संपर्क करीत आहेत.