खुशखबर ! वाळू आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार !!

आ. वैभव नाईकांच्या प्रयत्नांना यश ; हातपाटीच्या वाळूचे शासकीय दर उतरले

शिवसेना प्रणित वाळू व्यावसायिक संघटनेकडून आ. वैभव नाईक यांचा सत्कार

कुणाल मांजरेकर

मालवण : गगनाला भिडलेल्या वाळूच्या दरामुळे सर्वसामान्यांना वाढीव दराने वाळू खरेदी करण्याची वेळ आली होती. त्यामुळे शासन स्तरावरून वाळूचे दर कमी करण्याच्या वाळू व्यावसायिकांच्या मागणीला यश आले आहे. याबाबत आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे हातपाटीच्या वाळूचे शासकीय दर आता प्रतिब्रास ६०० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना देखील आता कमी दरात वाळू उपलब्ध होणार असल्याची माहिती आ. वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान, वाळू व्यावसायिकांची मागणी मान्य केल्याबद्दल शिवसेना प्रणित वाळू व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष बबन शिंदे यांच्यासह वाळू व्यावसायिकांनी आ. नाईक यांचा सत्कार केला.

येथील शिवसेना कार्यालयात आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा वाळू व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, मंदार केणी, कमलाकर गावडे, प्रसाद आडवणकर, किसन मांजरेकर, गणेश तोंडवळकर, आबा खोत, कृष्णा खोत, बंटी पेडणेकर, सदा पाटील, संतोष पाटील, बंड्या खोत आदी वाळू व्यावसायिक उपस्थित होते.

ग्रामसभेचा विरोध असेल तर वाळू उपसा बंद

शासनाने वाळूचे शासकीय दर कमी करताना अनधिकृत वाळू उपसा बंद करण्यासाठी कडक उपाययोजना केल्या आहेत. तसेच एखाद्या गावात ग्रामसभेने वाळू उपसा बंद करण्याचा ठराव केल्यास तेथील वाळूचे टेंडर लागणार नाही, त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने सर्वसामान्य ग्रामस्थांचा देखील विचार केल्याचे वैभव नाईक यांनी म्हटले आहे.

शासकीय वाळू दरात दरवर्षी १० % वाढ होत होती. त्यामुळे वाळूचे शासकीय दर प्रतिब्रास २५०० ते ३००० पर्यंत पोहोचले होते. त्यामुळे शासकीय दर कमी करण्याची मागणी सातत्याने वाळू व्यावसायिकांकडून करण्यात येत होती. याबाबत आमदार वैभव नाईक यांच्याकडून देखील सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांतून हातपाटीचे दर कमी करण्यात यश आले आहे. त्यामुळे वाळूचे दर ६०० रुपयांवर आणण्यात यश आले आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना देखील कमी दरात वाळू उपलब्ध होणार आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!