आडवण मध्ये ई श्रम कार्ड नोंदणी आणि आधार अपडेट शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद
माजी नगरसेविका पूजा करलकर यांचा पुढाकार
मालवण : शहरातील प्रभाग ७ मध्ये माजी नगरसेविका सौ. पूजा प्रमोद करलकर यांच्या आडवण येथील निवासस्थानी आयोजित केलेल्या ई श्रम कार्ड नोंदणी वाटप आणि आधार अपडेट शिबिराला शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
देऊळवाडा, सातेरी मंदिर आडवण, हिंदळेकरवाडा, लुडबेवाडा, कुंभारमाठ, भरड, रेवतळे आणि बाजारपेठ येथील नागरिकानी यावेळी उपस्थिती दर्शविली. या उपक्रमाबाबत माजी नगरसेविका पूजा करलकर यांचे आभार मानताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या नवनवीन योजना नागरिकां पर्यंत पोहोचविल्या बद्धल कौतुक केले.
सौ. करलकर यांनी केंद्रातील मोदी सरकारची उज्वला गॅस योजना, शेतकरी सन्मान योजना, घरकुल योजना यांचा प्रभागातील व इतर नागरिकाना लाभ मिळून दिला आहे. या ई श्रमकार्ड व आधार अपडेट उपक्रमासाठी सौ. स्वाती कुंभार, कु. शीतल जाधव, रोहन सावंत आणि सिद्धेश फटकुरे यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी विठू वराडकर, सौ. दिशा पाटकर, सौ. विशाखा पाटकर, अक्षय जुवेकर, महेश मांजरेकर (रेवतळे), रविकिरण आपटे आदी उपस्थित होते.