काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता काळातच भटक्या विमुक्त जातीवर अन्याय

भाजपचे भटके-विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माजी आ. नरेंद्र पवार यांचा आरोप

सिंधुदुर्गनगरी : कॉंग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता या राज्यात ज्या- ज्या वेळी आली त्या- त्या वेळी भटके विमुक्त जातीचे आरक्षण काढून घेणे योजना काढून घेणे महामंडळे रद्द करणे आणि ओबीसी आरक्षण बाबत भूमिका घेणे ही कामे केली असल्याचा आरोप भाजपचे भटके-विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी ओरोस येथे केला.


भाजपचे भटके- विमुक्त जातीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नरेंद्र पवार यांचा सिंधुदुर्ग दौरा आयोजित करण्यात आला होता या दौऱ्यामध्ये कोकण प्रभारी गोविंद गुंजालकर, धनगर समाज महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मिलिंद जाडकर, नवी मुंबई अध्यक्ष भास्कर यमगर, जिल्हाध्यक्ष नवलराज काळे तसेच जिल्हा परिषदेचे गटनेते रणजित देसाई, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्ष महिला जिल्हाध्यक्ष सौ दीपलक्ष्मी पडते, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, देवेंद्र सामंत, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रूपेश कानडे, श्रीपाद तवटे, दिपक खरात आदी पदाधिकारी उपस्थित होते. या भाजपच्या भटके विमुक्त जाती आघाडीच्यावतीने सिंधुदुर्गमध्ये पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या तसेच नगरपंचायतीचे नवनिर्वाचित भाजपचे गटनेते विलास कुडाळकर, नगरसेविका सौ. प्राजक्ता शिरवलकर, सौ नयना मांजरेकर, चांदणी कांबळी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी भटके-विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार यांनी सांगितले की भटके-विमुक्त समाज हा विकुरलेला आहे पण तो निर्णय पण आहे या समाजाकडे गांभीर्याने बघून त्यांचे संघटन उभे करणे गरजेचे आहे यासाठी भाजप कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर असलेल्या धनगर समाज व इतर भटके-विमुक्त समाज एकत्र करण्यासाठी काम करणार आहे यासाठी या आघाडी ची पदे दिली जाणार आहेत त्या माध्यमातून भाजपचे काम या वस्तीवर पोहोचविले जाणार आहे या समाजासाठी अनेक योजना आहेत पण त्या राबविल्या जात नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली हा समाज आता वंचित बहुजन आघाडी कडे वळत आहे या समाजाला भाजपकडे वळवण्यासाठी तळागाळापर्यंत काम करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!