शिवसेनेकडून माणगाव व घावनळे जि.प. मतदारसंघात विकास कामांचा धडाका
आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत विकास कामांची भूमिपूजने
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील माणगाव व घावनळे जि. प. मतदारसंघात शिवसेनेच्या माध्यमातून विकास कामांचा धडाका लावण्यात आला. रविवारी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत माणगाव, नानेली, मोरे, आंबेरी, घावनळे या गावातील अनेक विकास कामांची भूमिपूजने करण्यात आली.
यामध्ये माणगाव तिठा ते काळकाई मंदिर स्ट्रीट लाईट बसविणे, माणगाव गायचोरवाडी साकव बांधणे, माणगाव खालची बेनवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, माणगाव भटवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे,नानेली विघ्नेश्वर मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, मोरे मधलीवाडी येथे विहीर बांधणे, आंबेरी मधलीवाडी येथे विहीर बांधणे, घावनळे रामेश्वर मंदिर खुटवळवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे,घावनळे केरवडे रस्ता ते टिळवेवाडी भुईवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे,घावनळे बामणादेवी देवस्थान रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे,घावनळे माशाची वाडी येथे साकव बांधणे या कामांची भूमिपूजने पार पडली.
माणगाव व घावनळे जि.प. मतदारसंघात अजूनही अनेक विकास कामे मंजूर असून येत्या काही दिवसांत त्या कामांची देखील भूमिपूजने पार पडणार आहेत.
माणगाव येथे कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे,जि.प.सदस्य राजू कविटकर, उप तालुकाप्रमुख कृष्णा धुरी,विभाग प्रमुख अजित करमलकर, माजी जि.प.सदस्य रमाकांत ताम्हणेकर, पंचायत समिती सदस्या श्रेया परब, शरयू घाडी,विभाग संघटक कौशल जोशी,युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी,उप विभागप्रमुख बापू बागवे, घावनळे विभागप्रमुख रामा धुरी, गुरू माणगांवकर, सुधीर राऊळ, एकनाथ केसरकर,शामा पावसकर, ग्रा.प.सदस्य दीपक नानचे,वैभव परब, श्री.भोसले,राजन सावंत, मानकरी श्री.धुरी, अवधूत गायचोर,नामदेव धुरी,बंड्या कुडतरकर तर घावनळे येथे पंचायत समिती सदस्या मथुरा राऊळ, ऍड श्री.राऊळ, उपसरपंच दिनेश वारंग, प्रभाकर वारंग, पप्पू म्हाडेश्वर, परब सर,योगेश सावंत,सचिन नार्वेकर, संतोष नागवेकर, राम तावडे,आरती वारंग, सत्यवान वारंग, निलेश धुरी, रुपेश सावंत ,गणेश नार्वेकर, अनिल वारंग, महादेव कोरगावकर,बाबी भिंगारे, पपु टिळवे,दाजी धुरी,गणेश नार्वेकर, किरणं वारंग, ज्ञानेश्वर वारंग, अमोल तेली,दिवाकर झोरे,प्रथमेश वारंग, संजू तावडे,गणेश धुरी, सिद्धेश धुरी,बाबलो परब,कृष्णा तेली,अभिषेक वारंग, गोविंद वारंग, धर्मा सावंत,यश सुद्रीक उपस्थित होते. नानेली येथे सरपंच प्रज्ञेश धुरी, ऍड महेश धुरी,परशुराम घाडी,सिद्धेश धुरी,महेश घाडी,रोहित कोळसुलकर,कुणाल घाडी,विनय कदम, मोरे येथे रामचंद्र धुरी,महेश धुरी, विठ्ठल दळवी,नागेश दळवी, विलास धुरी,अंकुश धुरी,जयराम डोईफोडे, आंबेरी येथे सरपंच अजित परब, प्रशांत म्हाडगुत,सुधीर राऊळ,दिलीप म्हाडगुत,संदीप म्हाडगुत,मोहन म्हाडगुत,सुरेश मेस्त्री आदी शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.