आप्पा लुडबेंनी आयोजित केलेल्या ‘ई-श्रम’ नोंदणी व कार्ड वाटप उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मालवण : भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांनी आयोजित केलेल्या ई श्रम कार्ड नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रजिस्ट्रेशन झालेल्या सर्व लाभार्थ्यांना यावेळी ई-श्रम कार्डचे वितरण करण्यात आले.
समाजातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या मजूर वर्गाच्या व अंत्योदय घटकांसाठी भारत सरकारने राबविलेल्या उपक्रमाअंतर्गत ई-श्रम ही योजना संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांनी आपल्या निवासस्थानी मोफत ई श्रम कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १४४ नागरिकांची ई श्रम कार्डसाठी नोंदणी करून त्यांना कार्ड देण्यात आले. तर याच उपक्रमात आधारकार्डला मोबाईल नंबर लिंक करण्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५६ जणांचे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्यात आले.