जेष्ठ व्यापाऱ्यांचा प्रामाणिकपणा आणि सचोटी युवा व्यापाऱ्यांसाठी प्रेरणादायी
आचरा व्यापारी संघाचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर यांचे प्रतिपादन ; आचरा व्यापारी संघाला पुरस्कार प्रदान
कणकवली : आचरा बाजारपेठेतील जेष्ठ व्यापाऱ्यांचा प्रामाणिकपणा आणि सचोटीच्या व्यवहार आचरा पेठेच्या उत्कर्षासाठी महत्वपूर्ण आहे. तसेच सध्याच्या युवा व्यापाऱ्यांसाठी तो प्रेरणादायी असल्याचे मत आचरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर यांनी कणकवली येथे व्यक्त केले.
जिल्हा व्यापारी महासंघाच्या व्यापारी एकता मेळाव्या दरम्यान पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, सचिव नितीन वाळके, कोषाध्यक्ष अरविंद नैवाळकर, कणकवली तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष दिपक बेलवलकर, आचरा व्यापारी संघटनेचे जयप्रकाश परुळेकर, मंदार सांबारी, माणिक राणे, पंकज आचरेकर, मंगेश टेमकर, अनिल करंजे, हेमंत गोवेकर, परेश सावंत, चंदू कदम यांसह महासंघाचे अन्य पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा व्यापारी महासंघातर्फे देण्यात येणारा या वर्षीचा कै. प्रतापराव केनवडेकर आदर्श व्यापारी संघटना पुरस्कार आचरा व्यापारी संघटनेला यावेळी प्रदान करण्यात आला.