सौ. ज्योती तोरसकर यांचे सेट परीक्षेत दुहेरी यश
मालवण : येथील अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल मध्ये सहा.शिक्षिका म्हणून गेली २० वर्षे कार्यरत असलेल्या सौ. ज्योती रविकिरण बुवा-तोरसकर यांनी राज्यस्तरीय सहा. प्राध्यापक पदासाठी झालेल्या (सेट) परीक्षेत मराठी या विषयात यश मिळवले आहे. यापूर्वी झालेल्या सेट परीक्षेत इतिहास या विषयात त्याना यश मिळाले होते.
मराठी व इतिहास या दोन्ही विषयात यश मिळवणाऱ्या काही मोजक्या व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. सदर परिक्षा ही युजीसी व सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे तर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यासाठी घेतली जाते. ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या सदर परीक्षेसाठी गोवा तसेच महाराष्ट्र मधून ७९,७७५ बसले होते. त्यापैकी ५२९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ६.६४% एवढा लागला आहे. सदर परीक्षेत मराठी पाठोपाठ इतिहास या विषयात सौ. ज्योती रविकिरण बुवा- तोरसकर यांनी मिळविलेले यश कौतुकास्पद असून आपल्या स्पर्धा परीक्षेतील अनुभवाचा फायदा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.