जब जब मै बिखरा हू, दुगनी रफ्तार से निखरा हू !
नितेश राणेंच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर बॅनरबाजी
कुणाल मांजरेकर
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या भाजपचे आमदार नितेश राणे यांचा सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्या नंतर आ. राणेंच्या समर्थनार्थ त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर बॅनरबाजी सुरू करण्यात आली आहे.” जब जब मै बिखरा हू, दुगनी रफ्तार से निखरा हू !” असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र हा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आ. राणे यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. मात्र येथेही हा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्याने सर्वोच्च न्यायालयात आमदार राणे यांच्या अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. याची सुनावणी गुरुवारी घेण्यात आली. यावेळी आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळताना दहा दिवसात त्यांनी जिल्हा न्यायालयात हजर राहून अटकेची व जामीनाची प्रक्रिया पूर्ण करावी, तोपर्यंत आमदार नितेश राणे यांना अटक करू नये, अशी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आ. नितेश राणे यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर बॅनरबाजी सुरू करण्यात आली आहे. “तुम लाख कोशीश करो मुझे हराने की, जब जब मै बिखरा हू, दुगनी रफ्तार से निखरा हू !” असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला आहे.