सिंधुदुर्ग बँकेच्या वतीने दोन लाखांचा अपघात विमा प्रदान

मालवण : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने राठीवडे येथील धुरी कुटुंबीयांना दोन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

श्रीमती आदिती शंकर घुरी यांचे १८ जानेवारी रोजी निधन झाले. निधनाचे वृत्त समजल्यानंतर जिल्हा बँकेच्या विरण शाखेकडून धुरी यांचा विम्याचा प्रस्ताव सादर केल्यानंतर तो मंजूर होऊन २ लाख रुपये रक्कमेचा धनादेश विरण शाखेतर्फे देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डान्टस, संदीप उर्फ बाबा परब, मेघनाद धुरी, तालूका विकास अधिकारी विश्वनाथ डोलेंकर, सुरज गवंडी, संदिप मर्गज, पुर्णानंद सरमळकर व विरण शाखाव्यवस्थापक श्री. पाताडे आडी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!