पेंडूर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी दिलीप (दिपा) सावंत
उपाध्यक्षपदी रमेश गावडे यांची नियुक्ती
मालवण : पेंडूर विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी दिलीप उर्फ दिपा सावंत तर उपाध्यक्षपदी रमेश गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये गाव पॅनलच्या माध्यमातून संचालक मंडळाची बिनविरोध करण्यात आली होती. निवडणूक अधिकारी श्री. मयेकर यांच्या उपस्थितीत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी दिलीप सावंत आणि रमेश गावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अन्य कोणाचाही अर्ज आला नसल्याने ही निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली. या संचालक मंडळामध्ये नव्याने निवडून आलेल्या सत्यवान पाटील, बापू वायंगणकर, साबाजी सावंत, शैलेश परब, बिपिन परब, नितीन राऊळ, रामदास पेडणेकर, सौ. प्रज्ञा बांदेकर, श्रीमती रेखा मोर्वेकर, संतोष पेंडूरकर, राजेंद्र पंदारे या संचालक मंडळाचे देखील उपस्थित ग्रामस्थ यांच्या माध्यमातून अभिनंदन करण्यात आले.
यावेळी निवडणूक अधिकारी श्री. मयेकर, माजी सरपंच संजय नाईक सर, शेखर फोंडेकर, रविंद्र गावडे, विनायक सावंत पटेल, संदेश नाईक, पपू राणे, संतोष घाडी, पिंटू परब, संदुर फोफळे, अमित सावंत, अशोक परब, कृष्णा पेंडूरकर, बाळा गावडे, संतोष पवार, रमेश म्हापणकर, सुमित सावंत, सोसायटी कर्मचारी तळेकर, गणपत परब, वारंग तसेच गावातील इतर ग्रामस्थ उपस्थित होते.