आ. वैभव नाईक यांचा पाठपुरावा : मालवण शहरातील रस्ते होणार चकाचक
रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी दीड कोटींचा निधी मंजूर
कुणाल मांजरेकर
मालवण : राज्य नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मालवण नगरपरिषदेसाठी दीड कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून आणला असून मालवण शहरातील महत्वाच्या रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी हा निधी देण्यात आला आहे.
माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक मंदार केणी, पंकज सादये, यतीन खोत, सेजल परब, तृप्ती मयेकर, सुनीता जाधव, शिला गिरकर, दर्शना कासवकर, आकांक्षा शिरपुटे यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे याबाबत मागणी केली होती. विकास कामांना निधी मंजुरीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
यामध्ये मालवण नगररिषद मध्ये भरड नाका ते बंदर जेट्टी पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे निधी २० लाख रु, वायरी गर्दे रोड वराडकर गिरण ते नगरपालिका हद्द खडीकरण व डांबरीकरण करणे निधी २५ लाख रु, सायबा हॉटेल समोरील खाडीकिनारी सुशोभिकरण करणे निधी २० लाख रु, नंदु गवंडी घर ते चंडिका मांड रस्त्याचे डांबरीकरण करणे निधी २५ लाख रु, सुबोध मेडीकल भाजी मार्केट बांदेकर दुकानापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे निधी १० लाख रु, बाबला पिंटो घरापासून मुळेकर घर ते गर्दे रोड रस्त्याचे डांबरीकरण करणे निधी २० लाख रु, सोमवार पेठ सकपाळ नाका ते भंडारी हायस्कुल हॉल रस्ता डांबरीकरण करणे निधी १० लाख रु, दांडी शाळा ते दांडेश्वर रस्त्याचे डांबरीकरण करणे निधी २०लाख रु. हि कामे मंजूर करण्यात आली आहेत, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.