सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ गावकर यांचे निधन

मालवण : तालुक्यातील मसुरे खाजणवाडी येथील रहिवासी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ पुंडलिक गावकर (वय- ८६) यांचे नुकतेच राहत्या घरी निधन झाले.

काशिनाथ यांचे सामाजिक, कला, क्रीडा, क्षेत्रात मोठे कार्य होते. सर्वांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. जुन्या काळातील एक प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची मसुरे गावात ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मर्डे ग्रामपंचायतचे उपसरपंच राजेश उर्फ पिंट्या गावकर यांचे ते वडील होत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!