आ. नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिन अर्जावरील निर्णय १७ जानेवारीला ?

मुंबई उच्च न्यायालयात दोन्ही बाजूंकडील सुनावणी पूर्ण ; १७ जानेवारीला निर्णय अपेक्षित

कुणाल मांजरेकर

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील चाकू हल्ल्या प्रकरणी मुख्य सूत्रधार म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावरील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या पुढील सुनावणी १७ जानेवारीला होणार आहे. यावेळी या प्रकरणाचा निकाल येणे अपेक्षित मानले जात आहे.

आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यानंतर नितेश राणे यांच्या वकिलांनी त्यांच्या अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी गुरुवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी ही सुनावणी १७ जानेवारीला होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3842

Leave a Reply

error: Content is protected !!