अनाथांची माय हरपली !
पुणे – अनाथ मुलांसाठी आयुष्य वेचणाऱ्या पद्मश्री पुरस्कारप्राप्त, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांचे आज रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पुण्यात हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्या ७३ वर्षांच्या होत्या.
त्या अनेक दिवसांपासून पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या. सिंधूताई यांच्या मांजरी येथील पुनर्वसन केंद्रात अनेक अनाथ मुले राहत आहेत. त्यांच्या जाण्याने ही अनाथ मुले पोरकी झाली आहेत. सिंधूताई या माई नावाने परिचित होत्या.